न्यूज पीसीएमसी नेटवर्क
पिंपरी (दि. २७ डिसेंबर २०२२) :- बजाज डिस्कव्हर मोटार सायकल (एम.एच.१४ डी.सी ०८१३) वर बसुन आरोपी चाकण दिशेने जात होता.
नाकाबंदी दरम्यान फिर्यादी महाळुंगे पोलीस चौकीचे पोलीस शिपाई यांना आरोपीने त्याच्या जवळ २०० रुपये किंमतीचे लोखंडी पाते असेलेली हिरवी मुठ असणारी तलवार जवळ बाळगल्याचे आढळले.
निखील देवराम देवरे (वय १८ वर्षे, रा. जयसिंग देवकर कँटीगमध्ये, खराबवाडी) असे अटक केलेल्या आरोपीचे नाव आहे. हा प्रकार (दि. २६) रोजी पहाटे ३.५० वा. चे सुमारास महाळुंगे गाव कमानीसमोर, चाकण ते तळेगाव रोडवर घडला.
















