न्यूज पीसीएमसी नेटवर्क
पिंपरी (दि. २९ डिसेंबर २०२२) :- शहरातील उपप्रादेशिक परिवहन कार्यालयाच्या वायुवेग पथकाद्वारे वाहनांवर केलेल्या कारवाईमधून दंड भरून सात दिवसांत नागरिकांनी आपली वाहने सोडवून घेण्याचे आवाहन आरटीओने केले आहे.
वाहतुकीच्या नियमांचे उल्लंघन केल्याने आकारलेला दंड तसेच वाहनकराची रक्कम भरून कार्यालयाच्या आवारात असलेली वाहने परत घेण्याचे आदेश दिले आहेत.
थकीतकराच्या वसुलीसाठी वाहनांचा जाहीर लिलाव प्रक्रिया सुरू असून, अद्यापपर्यंत १८ वाहन मालकांना नोंदणीकृत पत्यावर नोटीस पाठविण्यात आल्या आहेत. तशा सूचनादेखील कार्यालयाच्या फलकावर प्रदर्शित केल्या आहेत. सात दिवसांत वाहने सोडवून घ्यावीत, अन्यथा बेवारस वाहने समजून जाहीर ई लिलाव करण्यात येईल, असे उपप्रादेशिक कार्यालयाच्या वतीने सांगण्यात आले.















