न्यूज पीसीएमसी नेटवर्क
पिंपरी (दि. ३१ डिसेंबर २०२२) :- महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळातर्फे फेब्रुवारी मार्च २०२३ मध्ये घेण्यात येणाऱ्या दहावी व बारावीच्या लेखीपरीक्षांचे संभाव्य वेळापत्रक जाहीर करण्यात आले होते. त्यावर सूचना, आक्षेप मागविण्यात आलेत. त्यानंतर आता राज्य मंडळाने अंतिम वेळापत्रक जाहीर केले आहे. त्यानुसार बारावीची लेखी परीक्षा २१ फेब्रुवारी ते २१ मार्च या कालावधीत, तर दहावीची लेखीपरीक्षा २ मार्च ते २५ मार्च या कालावधीत होईल, अशी माहिती राज्य मंडळाच्या सचिव अनुराधा ओक यांनी दिली आहे.
केंद्रीय माध्यमिक शिक्षण मंडळाने (सीबीएसई) दहावी, बारावीच्या लेखी परीक्षांचे वेळापत्रक जाहीर केले आहे. दहावीची परीक्षा १५ फेब्रुवारी ते २१ मार्च तर बारावीची परीक्षा १५ फेब्रुवारी ते ५ एप्रिल या दरम्यान होणार आहे.
गतवर्षी कोरोनामुळे परीक्षा उशिरा झाल्या होत्या. त्यामुळे निकालही उशिरा लागले होते. त्यामुळे अकरावी आणि पदवी प्रवेश रेंगाळले होते. यंदा मात्र परीक्षा वेळेत होणार आहेत. गतवर्षी सीबीएसईची परीक्षा दोन सत्रात घेण्यात आली होती. यंदा मात्र एकच परीक्षा होणार आहे.