न्यूज पीसीएमसी नेटवर्क
पिंपरी (दि. ०२ जानेवारी २०२२) :- छत्रपती संभाजी महाराज हे कधीच धर्मवीर नव्हते, विरोधी पक्षनेते अजित पवार यांच्या विधानसभेतील वक्तव्यामुळे छत्रपती धर्मवीर संभाजी महाराजांचा अपमान झाला. तमाम हिंदू बांधवांच्या भावना दुखावल्या गेल्या.
या विरोधात धर्मविरोधी अजित पवार यांचा भारतीय जनता पक्षाच्या प्राधिकरण चिंचवड स्टेशन मंडलातील कार्यकर्त्यानी आज संध्याकाळी पाच वाजता शाहूनगरमधील शिव शंभो मंदिरासमोर जाहिर निषेध केला.
यावेळी नगरसेवक केशव घोळवे, नगरसेविका अनुराधाताई गोरखे, शर्मिला बाबर, कमल घोलप, मंडल अध्यक्ष विजय शिनकर, सरचिटणीस नंदू भोगले, सूर्यकांत मोहिते, सुप्रिया ताई चांदगुडे, महिला मोर्चा अध्यक्षा दिपाली कारंजकर, माजी नगरसेविका जयश्री वाघमारे, नंदा करे, सुनिल वाट आणि मंडलातील कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.
















