न्यूज पीसीएमसी नेटवर्क
पिंपरी (दि. ०४ जानेवारी २०२२) :- लाकडी गोडाऊनमध्ये आरोपी आणि इतर सहाजण आले. त्यांनी राम गोपाल गौतम याला ‘ तु माझ्यावर मोबाईल चोरीचा आरोप कसा काय केला? ‘असे म्हणत, आरोपी सोबतच्या दोन जणांनी थापडबुक्यांनी मारहाण केली. त्यावेळी मनोज गुप्ता व राम शिनगारे गुप्ता हे दोघेजण सोडवासोडव करण्यासाठी गेले.
आरोपीने राम शिनगारे गुप्ता यास बाजुला घेऊन थापडबुक्यांनी मारहाण केली. त्यावेळी राम शिनगारे गुप्ता हे आरोपीला ‘ तु मारहाण करु नको ‘ असे म्हणत असताना आरोपीने तोंडावर थापडबुक्यांनी मारहाण केली, असे फिर्यादीत म्हटले आहे.
हा प्रकार (दि. २८/१२/२०२२) रोजी सायं ६.०० वाजता चिखली कुदळवाडी येथील रिगल पेट्रोल पंपाचे मागे, श्रीराम इनकॉरपरेटेड नावाच्या लाकडी गोडाऊनमध्ये घडली. फिर्यादी दिनेश श्रीराम शहा (वय ४७ वर्ष रा. औंध रोड, खडकी) यांनी आरोपी ज्ञानोबा बाबासाहेब घिगे व इतर सहा अनोळखी इसमांविरोधात चिखली पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे.















