न्यूज पीसीएमसी नेटवर्क
पिंपरी (दि. ०५ जानेवारी २०२२) :- पायी चालत घरी जात असताना फिर्यादीला आरोपी तोंड ओळखीचे दोन इसम भेटले. दरम्यान आरोपींनी जबरदस्तीने फिर्यादीच्या शर्टच्या खिशातून तीन हजार रोख रक्कम व स्टेट बँक ऑफ इंडीयाचे एटीएम कार्ड काढून घेतले, असे फिर्यादीत म्हटले आहे.
हा प्रकार (दि. ३) रोजी रात्री १०.०० वाजता आंबेडकरनगर रोड, भारत टेलरच्या पाठीमागे, देहुरोड येथे घडला.
फिर्यादी सेलवाकुमार मंदिरामुर्ती (वय ३५ वर्षे, रा. मरीमाता मंदिराजवळ गांधीनगर, देहुरोड) यांनी आरोपी दोन तोंड ओळखीचे ईसम (नाव पत्ता माहित नाही) यांच्या विरोधात देहूरोड पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. पोलिसांनी गुन्हा दाखल केला असून तपास सुरु आहे.
















