न्यूज पीसीएमसी नेटवर्क
पिंपरी (दि. ०७ जानेवारी २०२२) :- हुंडयामध्ये भरपूर सोनं व पैसे दिले नाहीत. व्यवसायासाठी पैसे दिले नाहीत, तसेच आरोपी पतीला दुस-या मुलीसोबत लग्न करायचे होते, या कारणासाठी व कौटुंबीक कारणाने पिडीत महिलेला आरोपींनी वारंवार मानसिक व शारीरीक त्रास दिला. क्रूर वागणुक देत छळ केला. तसेच घरात बंद करुन ठेवले.
आरोपी सासरे यांनी फिर्यादीसोबत अश्लील आणि अंगावरील कपडे ओढून फाडून फिर्यादीच्या मनास लज्जा उत्पन्न होईल असे कृत्य केले. ही घटना (दि. २८/१२/२०२१ ते दि. १७/०८/२०२२) दरम्यान बहिरोबावाडी, ता. कर्जत, जि. अहमदनगर येथे तसेच रामपूर हाट, जिल्हा बिरभूम, पश्चिम बंगाल येथे व वेगवेगळया ठिकाणी घडली.
२६ वर्षीय फिर्यादी महिलेने आरोपी पती अक्षय दिलीप लाळगे (वय २७ वर्ष), सासरे दिलीप झुंबर लाळगे (वय ५०), सासु जयश्री दिलीप लाळगे (वय ४६ वर्ष, सर्व रा. बहिरोबावाडी, ता. कर्जत, जि. अहमदनगर) यांच्या विरोधात दिघी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे.
















