न्यूज पीसीएमसी नेटवर्क
पिंपरी (दि. ०८ जानेवारी २०२२) :- शिक्षण पुर्ण झाल्यानंतर तुझ्यासोबत लग्न करणार, असे फिर्यादीच्या मित्राने फिर्यादीला लग्नाचे अमिष दाखवले. त्यास नकार देवून विरोध केला असतानादेखील आरोपीने फिर्यादीसोबत जबरदस्तीने शारिरीक संबंध करून फिर्यादीला ८ महिण्यांची गर्भवती केले आहे, असे फिर्यादीत म्हटले आहे.
ही घटना मे २०२२ मध्ये सायं ७ .३० वा. व माहे ऑगस्ट २०२२ मध्ये रात्री ८.०० वा. या दोन दिवशी राधाकृष्ण कुंज बिल्डींग, चौथा मजला, फ्लॅट नं. १०, गॅलाड चौक, पिंपरी येथील फिर्यादीच्या राहत्या घरी घडली.
फिर्यादी १५ वर्षीय अल्पवयीन पिडीत मुलीने आरोपी विधी संघर्षग्रस्त बालक (वय १६ वर्षे) याच्या विरोधात पिंपरी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे.
















