न्यूज पीसीएमसी नेटवर्क
पिंपरी (दि. ०८ जानेवारी २०२२) :- इन्व्हेसमेंट प्लॅनमध्ये गुंतवणक केल्यास एक महिन्यात गुंतवणुकीनंतर पैसे तिप्पट होणार, असे आरोपीने फिर्यादीला सांगितले. फिर्यादीचा विश्वास संपादन केला. आरोपीच्या सांगण्यावरुन फिर्यादी यांनी आठ लाख रुपये आरोपीला गुंतवणुकीसाठी पाठवले.
पंरतु, अदयाप त्याने फिर्यादी यांना कोणताही प्रॉफिट किंवा फिर्यादी यांनी दिलेले पैसे परत न करता स्वतःच्या फायद्यासाठी वापरून फिर्यादीची आर्थिक फसवणूक केली.
हा प्रकार (दि. १०/०१/२०२१) ते आजपर्यंत रामा मिलान्ज रेसेडेन्सेस, टिसीएस जवळ, भोईरवाडी, माणगांव, ता मुळशी, जि पुणे, येथे घडली. ३८ वर्षीय महिला फिर्यादीने आरोपी स्वप्निल संजय ब्रम्हे (रा १७२. किर्तीनगर, नवनाथ आयटीआय जवळ, काळे पाईल्स क्लिनिक, उमरेर रोड, दिघोरी, नागपुर) याच्या विरोधात फिर्याद दिली आहे. हिंजवडी पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे.
















