न्यूज पीसीएमसी नेटवर्क
पिंपरी (दि. १० जानेवारी २०२२) :- आज सुप्रीम कोर्टात महत्त्वाची सुनावणी पार पडणार आहे. आज सकाळी १०.३० वा. कोर्टात सुनावणीला सुरूवात होईल. सध्या पाच न्यायमूर्तींच्या घटनापीठासमोर शिवसेना कुणाची? हे प्रकरण आहे.
सत्तासंघर्ष प्रकरणी घटनापीठाने ८ मुद्दे निश्चित केले आहे. यातील १६ आमदारांच्या अपात्रतेसंदर्भाच्या मुद्द्यावरून शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाने, सात न्यायमूर्तींच्या घटनापीठाकडे द्यावे अशी मागणी मागील सुनावणीत केली होती.
त्यामुळे या मागणीवर आज निर्णय होण्याची शक्यता आहे. सुप्रीम कोर्टातलं प्रकरण ७ न्यायमूर्तींच्या बेंचकडे गेलं तर त्याचा परिणाम ही केस लांबण्यातही होण्याची शक्यता आहे. सरन्यायाधीश धनंजय चंद्रचूड यांच्या अध्यक्षतेखालील पाच सदस्यीय घटनापीठाकडे सुनावणी सुरू आहे. मागील सुनावणीत दोन्ही पक्षांकडून कोणत्या मुद्द्यांवर युक्तिवाद होणार, हे मुद्दे एकत्रितपणे सादर करण्याचे निर्देश घटनापीठाने दिले होते.


















