न्यूज पीसीएमसी नेटवर्क
पिंपरी (दि. १९ जानेवारी २०२३) :- चिखली, साने चौकातील भिमशक्तीनगर येथे फिर्यादीची बहीण (वय ५७ वर्षे) या एकटयाच राहण्यास आहेत. त्यांच्या शेजारीच त्यांचा मुलगा आरोपी हा त्याच्या पत्नीसह राहतो. त्याच्या वडिलांनी गावाकडील जमीन विकून त्याचे पैसे सर्वांना वाटणी करून दिले होते. आरोपीच्या पत्नीने वाटणीला आलेल्या पैशातून तिच्या नावे अर्धा गुंठा जमीन विकत घेतली. आरोपीस ती जमीन विकून पैसे हवे असल्याने तो त्याची आई व पत्नीसोबत काही महिन्यापासुन वाद घालत होता.
या कारणावरून आरोपीने राहत्या घरात त्याच्या आईसोबत वाद घालून त्यांना शिवीगाळ करण्यास सुरवात केली. त्याच्या बायकोने खरेदी केलेली जागा विकावी, अशी मागणी दोघांकडे करीत होता. परंतु, आरोपीची बायको त्याचे एकात नव्हती. आरोपीच्या बायकोला फिर्यादीच्या बहिणीने राजी करावे, यासाठी आरोपीने त्यांना हाताबुक्याने मारहाण करुन धक्काबुक्की केली. त्यात त्या खाली पडुन डोक्यास व चेह-यास मार लागून गंभीर जखम झाली. आरोपीने ही बाब सर्वांपासुन लपवुन ठेवली. कोणाला काहीएक न कळवता डॉक्टरांना ती बाथरुममध्ये घसरुन पडल्याचे खोटे सांगुन अॅडमीट केले.
तसेच आरोपीने फिर्यादीच्या बहिणीच्या घरातील कपाटाच्या काचा, टि.व्ही, संडास व तिचा मोबाईल फोडुन नुकसान केले आहे, असे फिर्यादीला जखमी बहिणीच्या दुसऱ्या मुलाकडून समजले, असे फिर्यादीत म्हटले आहे. ही घटना (दि. ३) रोजी रात्री ८.२८ वा. घडली. ५३ वर्षीय महिला फिर्यादी यांनी आरोपी सोमनाथ ऊर्फ शंकर दत्ता सुरवसे (रा. भिमशक्तीनगर, साने चौक, चिखली) याच्या विरोधात चिखली पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे.
















