न्यूज पीसीएमसी नेटवर्क
पिंपरी (दि. १९ जानेवारी २०२३) :- स्वतःच्या पत्नीची घटस्फोटाची नोटीस तयार केली. त्याच्यावर स्वतः पत्नीची बनावट सही केली. पत्नीला घटस्फोट दिल्यावर लग्न करणार आहे, असे फिर्यादीला लग्नाचे आमिष दाखवले.
मे २०२२ पासुन फिर्यादीच्या राहत्या घरी, देहुरोड येथे व माऊली बिल्डींग, आशिर्वाद कॉलनी, रुम नं. ८, अप्पुघरच्या मागील बाजुस निगडी येथे फिर्यादीच्या इच्छेविरुध्द वारंवार जबरी संभोग केला.
फिर्यादीस ८ महीन्याची गर्भवती असताना गर्भपात करण्यासाठी धमकी दिली, असे फिर्यादीत म्हटले आहे. ३३ वर्षीय महिला फिर्यादी यांनी आरोपी प्रविण बबन पानसरे (वय ३५ वर्षे, जात-हिंदु महार रा. चिंचवड रेल्वे स्टेशन, रेल्वे कॉटर्स, चिंचवड) याच्या विरोधात देहूरोड पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे.