न्यूज पीसीएमसी नेटवर्क
पिंपरी (दि. १० मार्च) :- पिंपरी चिंचवड नवनगर विकास प्राधिकरणावर अखेर भगवं वादळ आपले आस्तित्व दाखवणार आहे. शिवसेना-भाजपची युती झाल्यामुळे सहाजिकच शिवसेनालाही प्राधिकरणावर समसमान सदस्य नेमता येणार आहेत.
प्राधिकरण समितीवर शिवसेनेच्या वाटेला तीन जागा येणार असून, यात शिवसेनेकडून सुलभा उबाळे, गोविंद घोळवे, युवराज दाखले यांना संधी मिळाली असल्याचे अधिकृत सूत्रानुसार समजते.
मागे एकाप्रसंगी युवराज दाखले यांचे कौतुकोद्गार काढताना उद्धव ठाकरे म्हणाले होते की, ”युवराज दाखले सारख्या मावळ्याची आज शिवसेनेला खरी गरज असून, अन्यायाच्या विरोधात यल्गार उभे करणारा हा मावळा सर्वसामान्य जनतेचे नजीकच्या काळात आधारस्तंभ बनेल, त्याकरीता त्यास हवी ती ताकद शिवसेनेच्या वतीने पुरविली जाईल”. त्यामुळे प्राधिकरण समितीपदी युवराज दाखले यांची निवड निश्चित मानली जात आहे.
त्यांच्या कामाची पोच पावती यानिमिताने त्यांना मिळाली असल्याची वर्तुळात चर्चा असून, पिंंपरी चिंचवड शहरात शिवसेनेची ताकद कमी झालेली असताना, शहरात शिवसेनेचे आस्तित्व टिकविण्यासाठी नव्या दमाचे युवराज दाखले यांच्या कामगिरीची दखल प्रत्यक्षात पक्षश्रेष्ठी उद्धव ठाकरे यांनी घेतली असल्याची कुजबुज मातोश्रीवर सुरु आहे.











