न्यूज पीसीएमसी नेटवर्क
पिंपरी (दि. १० मार्च) :- पिंपरी चिंचवड महानगरपालिकेच्या वतीने प्रभाग क्रमांक १७ बिजलीनगर, शिवनगरी भागातील व प्रभाग क्र. १८ केशवनगर मधील तानाजीनगर, पवनानगर व रस्टंनकॉलनी येथील रस्त्यांचे काँक्रीटीकरणाचा भूमिपूजन शुभारंभ आमदार लक्ष्मण जगताप यांच्या हस्ते संपन्न झाले.
(दि.०८ ) रोजी सायंकाळी महापौर राहुल जाधव यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या या कार्यक्रमास सत्तारुढ पक्षनेते एकनाथ पवार, विधी समिती
सभापती माधुरी कुलकर्णी, ब प्रभाग अध्यक्षा करुणा चिंचवडे, नगरसदस्य सुरेश भाईर, राजेंद्र गावडे, नामदेव ढाके, नगरसदस्या अर्पणा डोके, अश्विनी चिंचवडे, स्विकृत सदस्य मोरेश्वर शेडगे, माजी नगरसदस्या कांताताई मोंढे, नामर्देशित सदस्य विठठल भोईर, कार्यकारी अभियंता प्रशांत
पाटील, चंद्रशेखर धानोरकर, माजी सह आयुक्त पांडुरंग झुरे, सामाजिक कार्यकर्ते अमोल थोरात, माहिती व जनसंपर्क विभागाचे रमेश भोसले आदी मान्यवर उपस्थित होते.
नगरसेवक नामदेव ढाके म्हणाले की, प्रभाग क्र. १७ मधील शिवनगरी, बिजलीनगर भागातील रस्ते सिमेंट काँक्रीटीकरणासाठी सुमारे १० कोटी ३९ लाख रुपये खर्च येणार आहे.
तसेच प्रभाग क्र. १८ केशवनगर मधील तानाजीनगर भागातील रस्त्याचे सिमेंट कॉक्रींटीकरण करण्यासाठी सुमारे ३ कोटी ९७ लाख आणि पवनानगर भागातील रस्त्यांचे सिमेंट कॉक्रींटीकरणासाठी ३ कोटी ९४ लाख रुपये व रस्टन कॉलनी अंतर्गत भागातील रस्त्यांचे सिमेंट कॉक्रींटीकरण करण्यासाठी सुमारे ४ कोटी ३७ लाख रुपये खर्च येणार आहे. सर्व कामे नोव्हेंबर २०२० अखेर पूर्ण होणार असून वाहतुकीच्या दुष्टीने नागरीकांना त्याचा मोठा लाभ होणार आहे.











