न्यूज पीसीएमसी नेटवर्क
पिंपरी (दि. १९ जानेवारी २०२३) :- फेब्रुवारी महिण्यात होणारी चिंचवड विधानसभेची पोटनिवडणुक पिंपरी चिंचवड परिवर्तन विकास आघाडी लढणार असून यासाठी पश्चिम महाराष्ट्र, मराठवाडा, विदर्भ व कोकणवासी तसेच इतर भागातील मतदारा बरोबरच शहरातील स्थानिक पण, राजकारणात अद्यापही वंचित राहिलेल्या घटकांची देखील मोठ बांधून चिंचवड विधानसभेची पोटनिवडणुक पिंपरी चिंचवड परिवर्तन विकास आघाडी लढणार असल्याचे आघाडीच्या संस्थापक अध्यक्षा छाया सोळंके-जगदाळे यांनी सांगितले आहे.
आज पिंपरी चिंचवड शहरामध्ये राज्यातीलच नव्हे तर देशातील देखील अनेक नागरीक स्थायिक झाले आहेत. पण अद्यापही त्यांच्यावरील बाहेरवाल्यांचा शिक्का पुसला गेला नाही. यामुळे त्यांना या शहरात वावरताना,उदयोग व्यावसाय करत असताना अनेक अडचणी, समस्यांना सामोरे जावे लागत आहे. पण त्यांच्या समस्यांचा प्रामुख्याने व आत्मियतेने कोणीही विचार करत नाही. खऱ्या आर्थाने जर पाहिले तर या वर्गातील ९५ टक्के नागरीकांना अनेक समस्यांना तोंड द्यावे लागत आहे. या वर्गातील अनेकांना आपल्या रोजगाराची शाश्वत खात्री नाही, उद्योग-व्यावासायाला संरक्षण नाही. यामुळे या घटकातील अनेकांची आर्थिक परस्थितीत ढासळली असून झोपडपट्टींची संख्या मोठ्या प्रमाणात या शहरात वाढत आहे. या शहरातील बहुतांश जणांनी महाराष्ट्रातील इतर जिल्हायातून शहरात आलेल्या लोकांना स्विकारले असले तरी अनेक जणांना मात्र अजूनही साप्तनिक पणाची वागणूक मिळत आहे. यासाठी शहरातील सत्तेचा, सामाजिक घटकांचा, प्रादेशीक घटकाचा समतोल राखण्यासाठी व यातुन या शहराला खऱ्या आर्थाने परिवर्तनाच्या वाटेवर नेहण्यासाठी या शहरात पिंपरी चिंचवड परिवर्तन विकास आघाडीची स्थापणा करण्यात आली आहे. ही आघाडी वंचितांची, शोषीतांची आणि कष्टकऱ्यांची नवी आशा म्हणून या शहरात कार्यरत राहणार आहे. आणि यातुनच पिंपरी चिंचवड महापालिकेच्या पुढील निवडणुकीत या शहरात महत्वाची भुमिका बजावत लोककार्यासाठी सज्ज असणार असल्याचे छाया सोळंके-जगदाळे यांनी सांगितले.
निवडणुक लढवणे हा प्रत्येक व्यक्तिचा व मतदाराचा संविधनात्मक मुलभूत अधिकार आहे. तसेच लोकशाहीचे संवर्धन व प्रसार अबाधित ठेवण्याचे देखील तेवढेच महत्वाचे साधन आहे. या दृष्टीकोनातून आम्ही या पोटनिवडणुकीकडे पाहत आहोत. या निवडणुकीच्या माध्यमातून पिंपरी चिंचवड परिवर्तन विकास आघाडीच्या मागे हजारो संख्येने असलेली गुप्त ताकद व अदृश्य शक्ति या पिंपरी चिंचवड शहराला पाहिला मिळेल. आणि भविष्यात या ताकदीचा उपयोग शहरातील सर्वच घटकांच्या न्याय हक्कासाठी निश्चितपणे केला जाणार आहे. परिवर्तन विकास आघाडीच्या उमेदवाराचा चेहरा आम्ही लवकरच शहरापुढे उभा करु.
– छाया सोळंके-जगदाळे, अध्यक्षा पिंपरी चिंचवड परिवर्तन विकास आघाडी…