न्यूज पीसीएमसी नेटवर्क
पिंपरी (दि. १९ जानेवारी २०२३) :- ‘ह’ क्षेत्रिय कार्यालय अंतर्गत प्रभाग क्र. २० कासारवाडी व प्रभाग क्र. ३० दापोडी मध्ये बुधवारी (दि. १८) रोजी महापालिकेच्या बांधकाम परवानगी व अनधिकृत बांधकाम नियंत्रण विभागाने सुरु असलेल्या अनधिकृत बांधकामावर कारवाई केली.
या कारवाईमध्ये प्रभाग क्र. २० कासारवाडी व प्रभाग क्र. ३० दापोडी येथील ०७ बांधकामांवर (अंदाजे ६२५.०० चौ. फुट) कारवाई करण्यात आली.
कारवाई क्षेत्रीय अधिकारी विजयकुमार थोरात यांच्या मार्गदर्शनाखाली उपअभियंता विजयकुमार शिंदे व इतर कनिष्ठ अभियंता, स्थापत्य अभियांत्रिकी सहाय्यक यांच्या पथकाने केली. कारवाईस ८ मनपा पोलीस, म. सु. व १६ जवान तसेच १ जे.सी.बी व १० मजूर यांच्या मदतीने करण्यात आली.