न्यूज पीसीएमसी नेटवर्क
पिंपरी (दि. २२ जानेवारी २०२३) :- धावत्या रेल्वेच्या धडकेत बोरघाटात खंडाळा ते मंकीहील दरम्यान अनोळखी व्यक्तीचा शनिवारी (दि. २१) रोजी मृत्यू झाला. मृताची ओळख अद्याप पटलेली नाही.
मृताविषयी माहिती असल्यास लोणावळा रेल्वे दूरक्षेत्राचे पोलिस अंमलदार ए. डी. जाधव यांच्याशी संपर्क साधण्याचे आवाहन करण्यात आले आहे. मृत इसमाचे वय अंदाजे ५० ते ५५ वर्ष आहे.
उंची पाच फूट आठ इंच आहे. रंगाने गहुवर्ण, चेहरा उभट, बांधा किरकोळ, दाढी व डोक्याचे केस पांढरे वाढलेले, कपाळ मोठे असे मृताचे वर्णन आहे. मृताच्या अंगात काळ्या रंगाचा पूर्ण बाह्याचा स्वेटर व नेसणीस चॉकलेटी रंगाची हाफ बर्म्युडा पॅंट परिधान करण्यात आली आहे.