न्यूज पीसीएमसी नेटवर्क
पिंपरी (दि. २४ जानेवारी २०२३) :- पायी रस्ता क्रॉस करत असताना मुंबईकडे जाणा-या लेनवर एका अज्ञात वाहनाने निष्काळजीपणे भरधाव वेगात वाहन चालवत फिर्यादीच्या भावाला धडक दिली.
गंभीर दुखापत झाल्याने उपचारादरम्यान फिर्यादीच्या भावाचा बाळु बापु अवचरे (वय ३२, रा. आंनदा पाडळे यांची रुम, म्हांळुगे) यांचा मृत्यू झाला. हा अपघात (दि. २२) रोजी रात्री ८.३० वा चे सुमारास मुंबई-बैगलोर हायवेवर, ऑरचिड समोर, बालेवाडी येथे घडला. आरोपी अज्ञात वाहन चालक फिर्यादीच्या भावाच्या मृत्यूस कारणीभूत ठरला.
याप्रकरणी गौतम बापु अवचरे (वय ३४ वर्षे, म्हांळुगे) यांनी हिंजवडी पोलीस ठाण्यात अज्ञात वाहन चालकाच्या विरोधात हिंजवडी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे.