न्यूज पीसीएमसी नेटवर्क
पिंपरी (दि. २५ जानेवारी २०२३) :- नेहरूनगर येथील प्राणी शश्रूषा केंद्रात पिंपरी-चिंचवड महापालिका, कॅनाईन कंट्रोल अॅन्ड केअर आणि पीपल्स फॉर अॅनिमल्स संस्था (पीएफए) यांच्या सहकार्याने श्वानसंतती नियमन शस्त्रक्रियेसाठी विस्तारित युनिट सुरू केले आहे. त्याचे उद्घाटन सामान्य प्रशासन विभागाचे उपायुक्त विठ्ठल जोशी यांच्या हस्ते नुकतेच करण्यात आले.
श्वानसंतती नियमन शस्त्रक्रियेच्या विस्तारित युनिटच्या कामाअंतर्गत नवीन ५८ पिंजरे तयार केले आहेत. पूर्वीचे ७२ पिंजरे आणि नवीन ५८ नवीन पिंजरे सेवेत दाखल झाल्याने पिंजऱ्यांची संख्या १३० इतकी झाली आहे. सध्या या केंद्रात प्रतिदिन १५ शस्त्रक्रिया होत आहेत. ही संख्या प्रतिदिन वाढणार आहे. एकूण शस्त्रक्रियेच्या १० टक्के शस्त्रक्रिया श्वानांच्या माद्यांच्या होतात.
नेहरूनगर येथील प्राणी शुश्रूषा एकात्मिक प्राणी नियोजन केंद्र म्हणून तयार होत आहे. या ठिकाणी भटक्या व पाळीव प्राण्यांसाठी आधुनिक सोयी-सुविधा उपलब्ध करून देण्यात आल्या आहेत.
शहरातील भटक्या कुत्र्यांची संख्या कमी करण्यासाठी आणखी किमान १०० पिजरे गरजेचे आहेत. प्रतिदिन ५० नसबंदी शस्त्रक्रिया होणे आवश्यक आहे. यासाठी येत्या सहा महिन्यांत आणखी १०० पिंजरे तयार केले जाणार आहेत. त्याबाबतची प्रक्रिया सुरु झाली आहे. – सचिन ढोले, उपायुक्त, पिपरी-चिंचवड महापालिका…

















