मा. अशोक लोखंडे :- संपादक तथा प्रतिनिधी
न्यूज पीसीएमसी नेटवर्क
पिंपरी चिंचवड (दि. २५ जानेवारी २०२६) :- नॅशनल कराटे फेडरेशन (NKF) व फिजिकल एज्युकेशन फाउंडेशन ऑफ इंडिया, युवा व्यवहार आणि क्रीडा मंत्रालय यांच्या संयुक्त विद्यमाने 29 ते 30 डिसेंबर 2025 दरम्यान तालकटोरा इंडोअर स्टेडियम, नवी दिल्ली येथे आयोजित सीझन 4 – तिसरी राष्ट्रीय कराटे चॅम्पियनशिप 2025 मध्ये विझडम पार्क, पिंपरी येथील खेळाडूंनी उल्लेखनीय यश संपादन केले.
या स्पर्धेत विवान उमेश गटकळ याने कुमिते प्रकारात सुवर्णपदक पटकावले. आध्या सागर जाधव हिनेही कुमिते प्रकारात सुवर्णपदक मिळवले. तर, ओवी उमेश गटकळ हिने कुमिते प्रकारात रौप्यपदक, तसेच काता प्रकारात कांस्यपदक जिंकले.
मुलांच्या मेहनतीबरोबरच, कोच योगेंद्र कुमार बिंद्रा यांच्या मार्गदर्शन व कठोर प्रशिक्षणानेही यश मिळवण्यात महत्त्वाची भूमिका बजावली. या राष्ट्रीय स्तरावरील स्पर्धेला देशभरातून मोठ्या संख्येने खेळाडूंनी सहभाग घेतला होता. या यशामुळे पिंपरी शहराचा नावलौकिक राष्ट्रीय पातळीवर वाढला असून खेळाडू व त्यांच्या प्रशिक्षकांचे सर्वत्र अभिनंदन होत आहे.
















