मा. अशोक लोखंडे :- संपादक तथा प्रतिनिधी
न्यूज पीसीएमसी नेटवर्क
पिंपरी चिंचवड (दि. २५ जानेवारी २०२६) :- महानगरपालिका हद्दीतील रावेत परिसरात मुख्य अशुद्ध पाण्याच्या (Raw Water) जलवाहिनीला गळती आढळून आली आहे. सदर गळती दुरुस्तीचे काम पाणीपुरवठा विभागाकडून तातडीने हाती घेतले असून ते आज सायंकाळपर्यंत पूर्ण करण्यात येणार आहे.
या दुरुस्ती कामामुळे पिंपरी-चिंचवड शहरातील अनेक भागांमध्ये आज संध्याकाळचा पाणीपुरवठा खंडित राहणार असून काही ठिकाणी कमी दाबाने पाणीपुरवठा होण्याची शक्यता आहे.
तसेच, उद्या देखील कमी दाबाने पाणीपुरवठा होऊ शकतो याची सर्व शहरवासियांनी कृपया नोंद घ्यावी व उपलब्ध पाण्याचा योग्य व काटकसरीने वापर करावा, असे आवाहन पाणीपुरवठा विभागाचे सह शहर अभियंता अजय सुर्यवंशी यांनी केले आहे.
















