न्यूज पीसीएमसी नेटवर्क
पिंपरी (दि. २६ जानेवारी २०२३) :- काळेवाडी येथील शिवतेज क्रीडा व शिक्षण मंडळ संचलित, श्रीमती लक्ष्मीबाई तापकीर माध्यमिक विद्यालय व एलबीटी इंग्लिश मीडियम स्कूल यांच्या संयुक्त विद्यमाने भारताचा ७४ वा प्रजासत्ताक दिन उत्साहात साजरा करण्यात आला.
बाबा स्वामी योग ग्रुपचे संस्थापक योगगुरू सुरेश विटकर यांच्या हस्ते ध्वजारोहण करण्यात आले. यावेळी हभप हापसे महाराज, संस्थेचे सचिव सागर तापकीर, संचालक मोहन तापकीर, राजेंद्र पवार, प्रकाश मुरकुटे,सामाजिक कार्यकर्ते एकनाथ काटे, संचालक अँड. सतिश घरत, दिलीप वढणे, दत्तात्रय काटे, अशोक हजारे, हर्षल परमार, जगदिश शाहू, शंकर खेडेकर,राजाराम पवार, प्रल्हाद कदम, रामकिसन वढणे, शांताराम भोंगाळे, शंकर बिराजदार, राजकुमार हैबतपुरे, दिलीप मुळे, अनिल तोडकर,सुरेश पाटील, भट साहेब, विद्याधर आभाणे, साळुंखे,गुरव, राजाराम शेळके उपस्थित होते.
याप्रसंगी विद्यार्थ्यांनी देशभक्तीपर नृत्य व गीते सादर करण्यात आली. तसेच शिक्षकांनी आपले मनोगत व्यक्त केले. यावेळी दोन्ही विद्यालयाचे मुख्याध्यापक, शशिकांत वाखारे, कोमल सातपुते आणि सर्व शिक्षक शिक्षकेत्तर कर्मचारी उपस्थित होते. सूत्रसंचालन माधुरी केदारी आणि बापू बल्लाळ यांनी केले, तर आभार शशिकांत रसाळ सर यांनी मानले.