न्यूज पीसीएमसी नेटवर्क
पिंपरी (दि. ०७ फेब्रुवारी २०२३) :- क्रांतिसूर्य महात्मा ज्योतिबा फुले एज्युकेशन फाउंडेशन संचालित न्यू सिटी प्राईड इंग्लिश मिडीयम स्कूलमध्ये रमाबाई आंबेडकर यांची जयंती उत्सहात साजरी करण्यात आली.
यावेळी कार्यक्रमाच्या प्रमुख पाहुण्या नंदिनी चौधरी मॅडम, शिक्षक व शिक्षकेत्तर कर्मचारी उपस्थित होते. प्रमुख पाहुण्यांच्या हस्ते रमाबाई आंबेडकर यांच्या प्रतिमेचे पूजन करण्यात आले.
नदीम रजा, समर्थ जोगदंड, अनिता परमार, अंकिता पाटील या विध्यार्थ्यांनी आपल्या भाषणातून रमाबाई बद्दल माहिती सांगितली. कार्यक्रमाच्या प्रमुख पाहुण्यानी विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केले. सहशिक्षिका सरला शिंदे यांनी रमाबाई यांच्या जीवन चरित्रावर प्रकाश टाकत म्हणाल्या कि, “भीमरायांच्या कार्यास दिला मदतीचा हात,केली हिमतीने प्रत्येक संकटावर मात, पुण्यवान धैर्यशील हिंमतवान बाई, सर्वांना पूज्य आहे ती माता महान रमाबाई”.
कार्यक्रमाचे सूत्रसंचालन सहशिक्षिका प्रज्ञा शिरोडकर व माधुरी पाटील यांनी आभार मानले.


















