- वाहन चालकांची जीव मुठीत घेऊन ये-जा; पुलाच्या दुरुस्तीची स्थानिकांची मागणी…
न्यूज पीसीएमसी नेटवर्क
पिंपरी (दि. ९ फेब्रुवारी २०२२) :- चिंचवडगाव आणि थेरगावला जोडला जाणारा मोरया गोसावी आणि धनेश्वर मंदिराजवळील पवना नदीवर उभारलेला छोटा पूल मोडकळीस आला आहे.

या छोट्या पुलावरून मोरया गोसावी मंदिर आणि चिंचवडगावात वाहनचालक ये- जा करीत असतात. हा पूल अरुंद असल्याने येथून अवजड वाहनांना बंदी आहे.

सद्यस्थितीत या पुलाचे सिमेंटचे कठडे काही ठिकाणी उखडले आहेत. कठड्यालगत असणाऱ्या डांबरी रस्त्याला भेगा पडल्या आहेत. त्यामुळे रस्ता कमकुवत होताना दिसून येत आहे.

वाहनचालक जीव मुठीत घेऊन ये-जा करताना आढळतात. पालिका प्रशासनाने तत्काळ या पुलाची डागडुजी करावी, अशी मागणी स्थानिक नागरिक करीत आहेत.















