- भाजपच्या उमेदवार अश्विनी जगताप यांचा मतदारसंघातील भेटीगाठींवर भर…
न्यूज पीसीएमसी नेटवर्क
पिंपरी (दि. १० फेब्रुवारी २०२३) :- चिंचवड विधानसभा मतदारसंघातील कवडेनगर, ज्ञानेश् पार्क आदी भागांमध्ये भाजपच्या अधिकृत उमेदवार अश्विनी जगताप यांचा प्रचार करत असताना महिलांची त्यांनी भेट घेतली. त्यावेळी त्यांना पाहून महिलांना अक्षरशः अश्रू अनावर झाले. या भागामध्ये विकासाची गंगा पोहोचवणारे ‘आमचे भाऊ कुठे गेले’ असा प्रश्न येथील प्रत्येकाच्या ओलावलेल्या डोळ्यांमध्ये दिसत होता. येथील प्रत्येकाला दिवंगत आमदार लक्ष्मण जगताप यांची अनुपस्थिती जाणवत होती.
चिंचवड विधानसभा मतदारसंघाच्या भाजप, बाळासाहेबांची शिवसेना, आरपीआय, राष्ट्रीय समाज पक्ष व शिवसंग्राम संघटना प्रहार संघटनेच्या महायुतीच्या उमेदवार अश्विनी लक्ष्मण जगताप यांनी शुक्रवारी कवडेनगर, ज्ञानेश पार्क भागांमध्ये मतदारांच्या गाठीभेटी घेतल्या. यावेळी महिलांची उपस्थिती लक्षणीय होती. आवर्जून महिला घराबाहेर पडून अश्विनी जगताप यांची भेट घेत होत्या.
येथील ग्रामस्थांनी अश्विनी जगताप यांचा सत्कार केला. यावेळी माजी नगरसेवक अंबरनाथ कांबळे, माधवी राजापुरे अमित पसरणीकर, राजेंद्र राजापुरे, जयश्री जगताप कोमल गोंडकर, श्रीनिवास बड़े, सखाराम रेडेकर यांच्यासह माजी नगरसेवक, पक्षाचे सर्व स्थानिक पदाधिकारी, कार्यकर्ते मोठ्या संख्येने यावेळी उपस्थित होते.
महिलाशक्ती तुम्हाला विधानसभेत पोहोचवेल..
कवडेनगर भागामध्ये ग्रामस्थांच्या गाठीभेटी घेतल्यानंतर यावेळी महिलांनी अश्विनी जगताप यांची भेट घेतली. तसेच त्यांना ‘ तुमच्यामध्ये आम्ही लक्ष्मण जगताप अर्थात आमच्या ‘भाऊंना पाहतो. त्यामुळे तुम्ही कोणतीही काळजी न करता स्वस्थ रहा. महिला शक्ती तुम्हाला विधानसभेत पोहोचवणार आहे’, अशा आर्त भावना व्यक्त केल्या.












