न्यूज पीसीएमसी नेटवर्क
पिंपरी (दि. १३ मार्च) :- पुणे म्हाडाच्या संचालकपदी पिंपरी चिंचवड महापालिकेच्या शिक्षण मंडळाचे माजी सभापती चेतन भुजबळ यांची नियुक्ती झाली आहे. गेल्या कित्येक वर्षांपासून रखडलेल्या महामंडळाच्या नियुक्त्या राज्य शासनाने हाती घेतल्या आहेत.
भुजबळ हे सध्या संत तुकाराम साखर कारखान्यावर संचालक पदावर कार्यरत आहेत. पिंपरी चिंचवड भाजपाचे शहराध्यक्ष आमदार लक्ष्मण जगताप यांच्या हस्ते चेतन भुजबळ यांचा सत्कार केला. यावेळी नगरसेवक शत्रुघ्न काटे, पक्ष प्रवक्ते अमोल थोरात, उद्योजक मनिष कुलकर्णी, नवीन लायगुडे आदी उपस्थित होते.











