न्यूज पीसीएमसी नेटवर्क
पिंपरी (दि. १४ फेब्रुवारी २०२३) :- दिघीतील आर्मी पब्लिक स्कूलमध्ये (दि. ८ आणि ९) वार्षिक समारोह विद्यालयाच्या प्रांगणात हर्श व उल्लासात साजरा करण्यात आला. यावेळी दिघी बाम्बे इंजीनियर ग्रुप आणि सेंटरचे कमान्डेंट, आर्मी पब्लिक स्कूलचे अध्यक्ष ब्रिगेडियर डी जी पटवर्धन, परिवार कल्याण संगठन बीईजी सेंटरच्या अध्यक्षा अर्चना पटवर्धन, शाइन मैकफर्सन, प्रिंसिपल, द बिशप्स को एड स्कूल, कल्याणी नगर व कर्नल अनुपम माथुर आणि श्रीमती माथुर आदी उपस्थित होते. तसेच पुण्यातील प्रतिष्ठित विद्यालयांच्या प्राचार्यांनी कार्यक्रमास हजेरी लावली.
कार्यक्रमाची सुरुवात विद्यालयाच्य प्राचार्या यस्मिन कौर यांच्या स्वागत भाषणाने झाली. यावेळी त्यांनी विद्यालयाचा वार्षिक अहवाल सादर केला. ‘ट्राउवेल, डिस्कवर दी ट्रेजर ऑफ़ लिटरेरी हिस्ट्री’ या विषयावर आधारित या कार्यक्रमत २००० ईसापूर्व ते २०२३ ई. पर्यंत मेसोपोटामिया, मिस्त्र, भारत आणि रोमची गौरवशाली सभ्यता दर्शवणारा रंगारंग कार्यक्रम प्रस्तूत कारण्यात आला. या नाट्यरुपी कार्यक्रमामध्ये मंगळवासी पृथ्वीवर येऊन मानवानी लावलेल्या वेगवेगळ्या शोधांबद्दल जाणुन घेतात व मानवाच्या निरंतर प्रयत्नांनी तो कसा प्रगतीपथावर मार्गक्रमण करत आहे हे दृष्टिक्षेपात आणून देतात. कार्यक्रमा दरम्यान प्रस्तुत करण्यात आलेल्या वेगवेगळ्या सांस्कृतिक नृत्य व लयबध्द गाण्यांनी उपस्थितांना मंत्रमुग्ध केले.
प्रमुख पाहुण्यांनी विद्यार्थ्यांचे कौतुक करत कार्यक्रमाबद्दल समाधान व्यक्त केले. कार्यक्रमाची सांगता प्राचार्या यस्मिन कौर यांच्या आभारप्रदर्शन व राष्ट्रगीताने झाली.