न्यूज पीसीएमसी नेटवर्क
पिंपरी (दि. १६ फेब्रुवारी २०२३) :- झेल्थ डिजीटल एजन्सी, इंडियन ग्लोबल मिडीयामध्ये तुमच्यासाठी चांगल्या ऑफर असून आपण इच्छुक आहात का? असे आरोपीने फिर्यादीला व्हॉटसअपद्वारे सांगितले. तुम्हाला प्रत्येक दिवशी ५००० रुपये ते ८००० रुपये मिळतील, असे आरोपीने फिर्यादीला आमिष दाखविले.
गुगल मॅपवर “Brewz Restaurant” याचा शोध घेवुन त्याचा स्क्रिन शॉट नंबरवर पाठवण्यास सांगितला. तसेच बी-०८-ए एम-७४६३ असा कोड पाठवुन आपण त्यावर माहीती सबमिट करा, असे सांगुन युजर आयडी @Pari210 यावरुन टेलिग्राम मेसेंजरव्दारे मेसेज करुन वेगवेगळे टास्क देवून सह आरोपी २ च्या अकाउंटवर ५,००,००० रुपये, सह आरोपी ३ च्या अकाउंटवर ५,००,००० रुपये व सह आरोपी ४ च्या अकाउंट वर १,००,००० रुपये, सह आरोपी ५ च्या युपीआय आयडी नं vsnalak@up वर ८०,००० रुपये, सह आरोपी ६ च्या युपीआय आयडी Khans74@upi वर ३०,००० रुपये असे एकूण २०,१५,००० रुपये पाठविण्यास प्रवृत्त केले. आरोपींनी फिर्यादीच्या रकमेचा अपहार करीत त्यांची आर्थिक फसवणुक केली.
ही घटना (दि. ०८/०२/२०१३ रोजी १०.३० ते ११/०२/२०२३ रोजी ११.२३ वाजेपर्यंत रा-ए/३०४, आर के रेसिडेन्सी, फोर स्टार सिटी जवळ, लक्ष्मी चौक, हिंजवडी येथे रहात्या घरी घडली.
महिला फिर्यादीने महिला आरोपी, नवाज सिपी अकाउंट नंबर ९२२०२००५५८२०५७१, सोंधी अकाउंट नं २४६७०५५००४६३, महिला आरोपी, गंगनसेन युपीआय आय डी नं-vsnaiak@upi, युपीआय आयडी Khans74@upi असे पैसे ट्रान्सपर करुन घेतलेले आरोपी (पुर्ण नाव व पत्ता माहीत नाही) यांच्या विरोधात फिर्याद दिली आहे. हिंजवडी पोलिसांनी आरोपींविरोधात १२८/२०२३ भा.दं.वि. कलम ४२०, ४०६ अन्वये गुन्हा दाखल केला आहे.