न्यूज पीसीएमसी नेटवर्क
पिंपरी (दि. १६ फेब्रुवारी २०२३) :- फ्लॅटवर पुर्वी अॅक्सीस बँकेचे कर्ज असताना आरोपीने बनावट कागदपत्रे तयार केली. ती खोटी कागदपत्रे आरोपीने कर्ज मंजुरीसाठी लाला अर्बन को ऑप बँक लि. नारायणगांव, शाखा काळेवाडी येथे अर्ज सादर केला. सिदधी निसर्ग सोसायटी, फ्लॅट क्रं. ६१०, बी विंग, विनोदे वस्ती, वाकड येथील फ्लॅटवर आरोपीने लाला अर्बन बँकेचे चाळीस लाख रुपयांचे कर्ज घेवुन त्याची परतफेड केली नाही. अॅक्सीस बँकेने कर्जाची परतफेड न केल्याने त्या फ्लॅटचा पुर्वीच ताबा घेतला असल्याचे निष्पन्न झाले. आरोपीने लाला अर्बन बँकेचा विश्वासघात करुन रक्कमेचा अपहार करीत बँकेची फसवणुक केली.
हा प्रकार (दि. ११/१२/२०१४) रोजीपासुन ते अद्यापपर्यंत घडला.
फिर्यादी महेंद्र बाबुराव आवटे (वय ४२ वर्षे, व्यवसाय नोकरी-शाखाधिकारी, रा. मु. पो. आनंदवाडी, नारायणगांव, ता. जुन्नर, जि. पुणे.) यांनी आरोपी महेश सुभाष गाते (वय ३९ वर्षे, रा. सिदधी निसर्ग सोसायटी, फ्लॅट क्रं. ६१०, बी विंग, विनोदे वस्ती, वाकड, पिं.चिं. पुणे ५७, दुसरा पत्ता स.क्रं. ८१/१ अ २ ब, विनोदे वस्ती, वाकड) याच्या विरोधात फिर्याद दिली आहे. वाकड पोलिसांनी आरोपी विरोधात १५०/२०२३ भा.दं.वि कलम ४६५, ४६८, ४७१, ४०६, ४२० गुन्हा दाखल केला आहे.