न्यूज पीसीएमसी नेटवर्क
पिंपरी (दि. १७ फेब्रुवारी २०२३) :- चिंचवड पोटनिवडणुकीत ८५८ मतदान पथके तयार केली आहेत. चिंचवड विधानसभा मतदारसंघात १३ संवेदनशील मतदान केंद्रे आहेत.चिंचवड मतदार संघातील निवडणूक ही त्रिरंगी होणार आहे. निवडणुकीच्या पार्श्वभुमीवर पोलिसांनी नुकताच मतदार संघातील काही प्रभागामध्ये मार्च केला. काही केंद्र संवेदनशील असली तरी चोख पोलीस बंदोबस्त असणार आहे.
चिंचवड विधानसभा मतदारसंघातील संवेदनशील मतदान केंद्रांसाठी नेमलेल्या सूक्ष्म निरीक्षकांचे प्रशिक्षण जिल्हा निवडणूक अधिकारी कार्यालयामार्फत आयोजित करण्यात आले. चिंचवड विधानसभा मतदारसंघात १३ संवेदनशील मतदान केंद्रे आहेत. या मतदान केंद्रांच्या अनुषंगाने घ्यावयाची विशेष काळजी, सादर करायचे अहवाल आदींच्या अनुषंगाने प्रशिक्षण देण्यात आले.
चिंचवड विधानसभा मतदारसंघात ५१० मतदान केंद्रे आहेत. त्याव्यतिरिक्त नियमानुसार १० टक्के राखीव मनुष्यबळाची तरतूद करणे आवश्यक असते. त्यानुसार पहिल्या सरमिसळीच्या (रँडमायझेशन) वेळी निवडणूक प्रक्रियेसाठी सर्व मनुष्यबळाची निवड करून त्यांना प्रशिक्षण देण्यात आले. दुस-या रँडमायझेशन वेळी प्रशिक्षित मनुष्यबळातून मतदान पथके तयार करून त्यांना संगणकीय प्रणालीने विधानसभा मतदारसंघ नेमून दिले.