न्यूज पीसीएमसी नेटवर्क
पिंपरी (दि. ०४ मार्च २०२३) :- अट्टल दुचाकी चोरास वाकड पोलीस स्टेशनच्या तपास पथकाने बेड्या ठोकल्या आहेत. त्याच्याकडून तब्बल १,८५,००० रुपये किंमतीच्या ४ मोटार सायकली जप्त करून ४ गुन्ह्यांची उकल केली आहे. दादासाहेब ऊर्फ अनिकेत बाळु निकाळजे (वय २६ वर्षे रा. इंदीरानगर झोपडपट्टी, सुकटा, ता. भुम जि. उस्मानाबाद) असे अटक केलेल्या आरोपीचे नाव आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, तपास पथकासह पेट्रोलींग करीत असताना चोरीची मोटार सायकल विक्रीसाठी आरोपी काळेवाडीतील पाचपिर चौकात येणार असल्याची माहिती मिळाली. पोलिसांनी तात्काळ सापळा रचला. घटनास्थळी एकजण मोटार सायकलवर येवुन थांबला. त्याची हालचाल संशयीत वाटली. पोलिसांनी त्याला ताब्यात घेतले. त्याच्या ताब्यातील यामाहा एफझेड मोटार सायकल (एमएच १४एफझेड.७७०३) याबाबत चौकशी केली असता त्याने उडवाउडवीची उत्तरे दिली. त्यामुळे त्यास पोलीस स्टेशन येथे आणुन विश्वासात घेवून चौकशी केली असता त्याने यामाहा एफझेड मोटार सायकल चोरी केल्याचे सांगितले. वाकड पोलीस स्टेशनचा अभिलेख तपासला असता आरोपीवर वाकड पोलीस स्टेशन येथे रजि.नं.९५ / २०२३ भादविक ३७९ अन्वये गुन्हा दाखल असल्याची माहीती मिळाली. आरोपीकडे अधिक तपास केला असता त्याने दाखल गुन्हयाव्यतिरीक्त आणखी दोन मोटार सायकल चोरी केल्याचे कबुल केले असुन त्याचेकडुन मोटार सायकली जप्त करण्यात आल्या आहेत. आरोपीकडुन एकुण १,८५,००० रुपये किंमतीच्या ४ मोटार सायकली जप्त करण्यात आल्या आहेत. आरोपीवर वाकड पोलीस स्टेशन गु. रजि. नं. ९५ / २०२३ भादविक ३७९, वाकड पोलीस स्टेशन गु. रजि.नं. ८५७/२०२२ भादविक ३७९, वाकड पोलीस स्टेशन गु. रजि. नं. ९९८ / २०२३ भादविक ३७९, वाकड पोलीस स्टेशन गु.रजि. नं. १०९३ / २०२२ भादविक ३७९ नुसार गुन्हे दाखल आहेत.
ही कारवाई विनयकुमार चौबे पोलीस आयुक्त, पिंपरी चिंचवड, मनोज लोहीया सह पोलीस आयुक्त, डॉ. संजय शिंदे अपर पोलीस आयुक्त, डॉ. काकासाहेब डोळे पोलीस उप आयुक्त, परि २, श्रीकांत डिसले, सहा. पोलीस आयुक्त वाकड विभाग यांच्या मार्गदर्शनाखाली सत्यवान माने, वरिष्ठ पोलीस निरीक्षक, संतोष पाटील पोलीस निरीक्षक गुन्हे-१, रामचंद्र घाडगे पोलीस निरीक्षक गुन्हे-२, सपोनि संतोष पाटील, पोउपनि सचिन चव्हाण, पोहवा. अतिश जाधव, पोना. प्रशांत गिलवीले, पोशि स्वप्निल लोखंडे, पोशि. विनायक घार्गे, पोशि कोर्तेय खराडे, पोकॉ. अजय फल्ले, पोशि तात्या शिंदे, पोशि भास्कर भारती यांनी मिळून केली आहे.
















