न्यूज पीसीएमसी नेटवर्क
पिंपरी (दि. ५ मार्च २०२३) :- लिओ बरनेट मिडीया ग्रुप कंपनीमध्ये आरोपींनी फिर्यादीला ऑनलाईन रिव्हिव देण्याच्या कामाचे अमिष दाखवले. फिर्यादीचा विश्वास संपादन करून, त्यांना फोन पे व्दारे विविध खात्यांवर ऑनलाईन ८,२५,००० रुपये भरण्यास भाग पाडले. तसेच साक्षीदार श्वेता सहदेव (रा. डी-७१५, आयलँड सोसायटी, शंकर कलाटेनगर, वाकड) यांची देखिल आरोपी महिलेने अशाच प्रकारे ६५,००० रुपये विविध खात्यावर ऑनलाईन भरायला भाग पाडुन त्या बदल्यात कोणत्याही प्रकारची नोकरी अथवा परतावा न देता त्यांची फसवणूक केली आहे, असे फिर्यादीत म्हटलं आहे.
हा प्रकार (दि. २१/०२/२०२३ ते दि. ०४/०३ /२०२३) दरम्यान फिर्यादीच्या राहत्या घरी फ्लॅट नं. ए-२७५०, कासा ७ सोसायटी, रोजवुड हॉटेल चे पाठीमागे, थेरगाव येथे घडली.
फिर्यादी महिला हिने (वय ३५ वर्ष, शिक्षण एमएससी, धंदा खाजगी नोकरी, रा. फ्लट नं. ए २७५०, कासा ७ सोसायटी, रोजवुड हॉटेल चे पाठीमागे, थेरगाव) यांनी आरोपी मो.क्र. ९०६०५३७ २४४ वरिल महिला कनिका चौहान (पुर्ण नाव-पत्ता माहित नाही) यांच्या विरोधात फिर्याद दिली आहे.
वाकड पोलिसांनी २२८/२०२३ भा.द.वि. कलम ४२०, ४१९, ४०६ व मा. तंत्र. का. सन २००८चे कलम ६६ (सी) (डी) नुसार आरोपी विरोधात गुन्हा दाखल केला आहे.
















