न्यूज पीसीएमसी नेटवर्क
पिंपरी (दि. ५ मार्च २०२३) :- एमएससीबी विज वितरण महामंडळातून बोलत असल्याचे भासवले. फिर्यादीच्या राहत्या घराचे लाईट बील पेडींग असून मीटर कट होणार असल्याचे फसवे संदेश फिर्यादीला पाठवले. त्यामधील फसव्या लिंकद्वारे क्विक सपोर्ट नावाचे स्क्रिन शेअरिंग अॅप्लीकेशन डाउनलोड करण्यास फिर्यादीला भाग पाडले. फिर्यादीचे बँक खात्याचे तपशिल प्राप्त केले. फिर्यादीच्या खात्यातून एकूण १,७५,५०० रुपयांची आर्थिक फसवणूक केली, असे फिर्यादीत म्हटले आहे.
हा प्रकार (दि. १४/०२/२०२३) रोजी दुपारी २.३० च्या सुमारास संगणकिय साधनाद्वारे, फिर्यादीच्या राहत्या घरी घडली.
महिला फिर्यादी (वय ४६ वर्ष, रा. फलॅट क्र १७, परंपरा अपार्टमेंट, गुरुविहार कॉलनी, पांजरपोळ, भोसरी) यांनी आरोपी मोबाईल क्रमांक ९७४९७२२८३८ आणि ९७४९७२२८३८ चा वापरकर्ता इसम याच्या विरोधात फिर्याद दाखल केली आहे. भोसरी पोलिसांनी आरोपीच्या विरोधात २०० / २०२३. भा.दं.वि कलम ४१९, ४२० मा तंज. अधि६६ (सी).६६ (डी) नुसार गुन्हा दाखल केला आहे.
















