न्यूज पीसीएमसी नेटवर्क
पिंपरी (दि. ५ मार्च २०२३) :- काळ्या रंगाच्या हिरो कंपनीच्या स्प्लेंडर प्लस या गाडीवर आरोपीने आफिम हा अंमली पदार्थ विक्रीसाठी बाळगला. पोलिसांच्या गुन्हे शाखा अंमली पदार्थ विरोधी पथकाने आरोपीला ताब्यात घेतले. ही कारवाई (दि. ४) रोजी दुपारी १.४० च्या सुमारास विद्या सहकारी गृह रचना संस्था मर्या. शिक्षक सोसायटीमधील श्री दत्त महाराज मंदिर चौकाजवळ, रस्त्याच्या कडेला एम. एस. इ. बी पोलच्या बाजुला, तळेगाव दाभाडे येथे केली.
त्याच्याकडून २,०५,६०० रुपये किंमतीचा ५१४ ग्रॅम वजनाचा आफिम, १४,००० रुपये किंमतीचा मोबाईल व ५५,००० ची दुचाकी असा एकूण २,७४,६०० रुपये किंमतीचा मुद्देमाल जप्त केला. तळेगाव दाभाडे पोलिसांनी आरोपीच्या विरोधात ११०/२०२३ एन.डी.पी.एस. अॅक्ट कलम ८ (क). १७ (ड). २९ नुसार गुन्हा दाखल केला आहे. आरोपी दिनेश रामेश्वर लाल जाट (वय २५ वर्षे, रा विद्या सहकारी गृह रचना संस्था, मर्या. प्लॉट क्र ११, दत्त मंदिराचे शेजारी, शिक्षक सोसायटी तळेगाव दाभाडे, मुळ रा. सधारिया खेड, भदेसर भादरोसा, जि चित्तोडगड राज्य राजस्थान) असे अटक केलेल्या आरोपीचे नाव आहे.
आरोपीने आफिम त्याच्या गावाकडील ओळखीचा दिपक सुधार (संपुर्ण नाव माहिती नाही, रा. बडीसादरी, जि. चित्तोडगड, राजस्थान याच्याकडुन आणला असल्याचे तपासात सांगितले.
















