न्यूज पीसीएमसी नेटवर्क
पिंपरी (दि. ५ मार्च २०२३) :- इंन्सुरन्स काढून देण्याचा बहाणा केला. आरोपीने फिर्यादीकडून ४,८३,३३८ रुपये वेळोवेळी घेतले. इंन्सुरन्स न देता व पैसेही परत न करता विश्वासघात करुन आरोपीने फिर्यादीची आर्थिक फसवणुक केली आहे, असे फिर्यादीत नमूद आहे.
ही घटना जुन २०२२ ते आजपर्यंत फिर्यादीच्या राहत्या घरी घडली. फिर्यादी महिलेने (वय ३६ वर्षे, धंदा-गृहीणी, रा. फ्लॅट नं आय. ६०६, ऐश्वर्यमकोर्ट यार्ड फेज नं.०१, आकुर्डी चिखली रोड, चिखली) यांनी आरोपी मोबाईल धारक ७०७३५९६९५४ व ९२८९२२०१३९ व कोटक महिंद्रा बँकेचे खाते क्र. ०४१४६२६७९७ चा खातेधारक, तसेच बॅक ऑफ बरोदा बँकेचा खाते क्र.०६०५०१००० २७८०४, तसेच फिनकेअर बॅक बॅकेचा खाते क्र. २२१०००११८०८१६६ आय. आर.डी.ए. चे प्रमाणपत्र देणारे राजीव रंजन यांच्या विरोधात फिर्याद दिली आहे.
चिखली पोलिसांनी १३६/२०२३ भा.दं.वि.क. ४०६,४२० माहीती तंत्रज्ञान कायादा कलम ६६ डी नुसार आरोपींच्या विरोधात गुन्हा दाखल केला आहे.
















