- विविध क्षेत्रात उल्लेखनीय कामगिरी करणाऱ्या महिलांचा सत्कार…
न्यूज पीसीएमसी नेटवर्क
पिंपरी (दि. १० मार्च २०२३) :- जागतिक महिला दिनानिमित्त मावळ येथील न्यायालयात वडगांव मावळ बार असोसिएशन, विधी सेवा समिती वडगाव मावळ यांच्या संयुक्त विद्यमाने विविध क्षेत्रात उल्लेखनीय कामगिरी करणाऱ्या महिलांचा सत्कार करण्यात आला. यावेळी महिला न्यायाधीशांच्या हस्ते दिप प्रज्वलन करुन कार्यक्रमाची सुरवात करण्यात आली.
जागतिक महिला दिन सप्ताह शनिवार (दि. ४ ते ११) दरम्यान आयोजित करण्यात आला. यावेळी वडगाव मावळ येथील न्यायाधीश देशमुख, चव्हाण, आगरवाल, बर्गे, उमरेडकर, कातकर, पाटील, बार असोसिएशनचे अध्यक्ष अॅड. संजय वांद्रे, उपाध्यक्ष अॅड. चंद्रकांत खांदवे, सचिव अॅड. देविदास मराठे, अॅड. सुचेता आंबिकर, खजिनदार अॅड. रुपाली सातकर, सदस्य अॅड. रवींद्र विनोदे, अॅड. समीर खांदवे, अॅड. अरविंद गोतारने, अॅड. मृणाल टिळेकर भुजबळ, अॅड. सुरेखा ढोरे जोरी, अॅड. अमृता पवार, अॅड. अपूर्वा गिरमे, अॅड. जयश्री शितोळे, अॅड. हेमंत वाडेकर, अॅड. महेंद्र खांदवे, अॅड. शैलेश पडवळ, अॅड. पवन भंडारी, अॅड. सुधा डिमळे, अॅड. श्रध्दा मराठे तसेच अनेक वकील भगिनी उपस्थित होत्या.
यावेळी सामाजिक व वकिली क्षेत्रात उल्लेखनीय कामगिरी केलेल्या प्रमिला मनोहर भालके, हर्षदा भवानीप्रसाद दुबे, ज्योती दीपक कंधारे, सोनाली भागोजी खांदवे, अॅड. विजया भांडवलकर, अॅड. जयश्री शितोळे यांचा सन्मान करण्यात आला. यावेळी उपस्थित महिलांना भेटवस्तु देऊन त्यांचाही सत्कार करण्यात आला.















