न्यूज पीसीएमसी नेटवर्क
पिंपरी (दि. १४ मार्च २०२३) :- जुन्या पुणे-मुंबई महामार्गावरील वाहनांना सोमाटने टोल नाक्यावर टोल आकारण्यात येणार नाही, असे आश्वासन सार्वजनिक बांधकाम मंत्री रवींद्र चव्हाण यांनी उपोषणकर्त्यांना दिले. आश्वासनानंतर सोमाटने टोल हटाव कृती समितीचे किशोर आवारे यांनी बेमुदत उपोषण मागे घेतले आहे. शनिवारपासून बेमुदत उपोषण सुरू होते.
अधिवेशन संपताच मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि देवेंद्र फडणवीस यांच्यासोबत आवारे यांची बैठक होणार आहे. त्यानंतर सोमाटने टोल नाका बंद होणार की नाही, हे स्पष्ट होणार आहे.
सध्या तरी या टोल नाक्यावर वाहनांना टोल आकारला जाणार नाही. ‘आयआरबी’ने वाहनधारकांची अडवणूक केल्यास पुढील स्वरुपाला सामोरे जावे लागेल, त्याची जबाबदारी ‘आयआरबी’ची असेल असा इशारा किशोर आवारे यांनी दिला आहे.















