न्यूज पीसीएमसी नेटवर्क
पिंपरी (दि. १८ मार्च २०२३) :- पुणे महानगर प्रदेश विकास प्राधिकरण (पीएमआरडीए) हद्दीत उपलब्ध १२ सुविधा क्षेत्राचे भूखंड ८० वर्षाच्या कालावधीसाठी भाडेपट्टयाने देण्यात येणार आहे. त्यासाठी ई- लिलाव प्रक्रिया राबविण्यात येणार आहे. या भूखंडासाठी पीएमआरडीएने लघुत्तम किंमत निश्चित केली आहे. त्यानुसार पीएमआरडीएच्या तिजोरीत ३५ कोटी ४९ लाख रुपयांच्या उत्पन्नाची भर पडणार आहे.
पीएमआरडीएने मुळशी तालुक्यात येणाऱ्या हिंजवडीतील ४, मानमधील ३, पिरंगुटमधील २, भूगावमधील २ आणि कासार अंबोलीमधील १ असे एकूण १२ भूखंड १२ एप्रिल रोजी होणाऱ्या ई- लिलावाद्वारे हस्तांतरित करण्याचा निर्णय घेतला आहे.
कमीत कमी १००३.६३ चौरस मीटर तर, जास्तीत ८४७० चौरस मीटर क्षेत्रादरम्यान हे भूखंड आहेत. त्यासाठी इच्छुक लिलाव धारकांना शासनाच्य hrrqt:// eaubtion.nib.in य संकेतस्थळावरून २० मार्च सकाळी ११ पासून ५ एप्रिल रोजी सायंकाळी ५ वाजेपर्यंत नावनोंदणी (रजिस्ट्रेशन) करता येईल. लिलावाची संपूर्ण प्रक्रिया संबंधित संकेतस्थळावरच ऑनलाईन पद्धतीने होणार आहे. या लिलाव प्रक्रियेची संपूर्ण माहिती पीएमआरडीएच्य hrrqt://{ mrda.gov.in संकेतस्थळावर उपलब्ध करून देण्यात आली आहे.
या सर्व भूखंडावर प्राधिकरणाच्या सन २०१८ च्या मंजूर विकास नियमावलीनुसार विकास प्रयोजन व चटईक्षेत्र निर्देशांक (एफएसआय) अनुज्ञेय होईल. त्यासाठी इच्छुक विकसकांनी लिलाव प्रक्रियेत सहभाग घ्यावा, असे आवाहन पीएमआरडीएचे महानगर आयुक्त राहुल महिवाल यांनी केले आहे.