न्यूज पीसीएमसी नेटवर्क
पिंपरी (दि. १७ मार्च) :- आपला नातू पार्थ पवार याच्या मावळ लोकसभा प्रचाराचा शुभारंभ चिंचवड येथे शरद पवार यांच्या उपस्थितीत पार पडला. यावेळी बोलताना शरद पवार म्हणाले की, जम्मू पासून श्रीनगरपर्यंत भारताच्या जवानांना घेऊन बस निघाली होती. स्फोटके घेऊन आलेली जीप बसवर आदळली. आपल्या ४० जवानांना मृत्यू आला. दुस-या दिवशी आम्हाला दिल्लीला बोलावलं. जवानांची हत्या केल्यानंतर घरातलं भांडण काडायचं नाही, म्हणून आम्ही सरकारच्या पाठीशी उभारण्याचं काम केलं.
आम्हाला विचारलं होतं काय करायचं म्हणून. त्यावेळी मी सांगितलं की, लष्कराला दहशतवाद्यांचे अड्डे उध्वस्त करण्याचे आदेश द्या म्हणून. जे शस्त्र लागेल त्याचा उपयोग करावा. कारण, जवानांची हत्या अस्वस्थ करणारी आहे. परंतु, हा निर्णय घेतेवेळी बैठकीला नरेंद्र मोदी आणि निर्मला सितारामण उपस्थित नव्हते. हे महाशय धुळ्यात होते. परंतु, प्रधानमंत्री यांना ही गोष्ट महत्वाची वाटली नाही, हे खेदाची बाब आहे.
राफेलच्या एका विमानाची ३५० कोटी किंमत होती. भाजपच्या काळात इमानाची किमीत ५६० कोटी रुपये झाली. एक वर्षानंतर ७५० कोटी झाली. त्यानंतर फ्रान्सची कंपनी आणि रिलायन्स कंपनीमध्ये करार झाला. त्यावेळी १६०० कोटी रुपये विमानाची किंमत झाली. कागदपत्रे मागितली त्यावर ते कागदपत्र संरक्षण खात्याच्या कार्यालयातून चोरीला गेल्याचे जाहिर केलं. तीन दिवसांनी हिंदू वर्तमानपत्रात सर्व कागदपत्र छापून आली. देशाच्या संरक्षणाची गुप्त कागदं सांभाळता येत नाहीत. नुसती ५६ इंचाची छाती काय कामाची आहे, असा निशाना पवार यांनी यावेळी भाजपवर साधला आहे.











