न्यूज पीसीएमसी नेटवर्क
पिंपरी (दि. ०४ एप्रिल २०२३) :- पिंपरी-चिंचवड शहर पोलिस दलातील सहा पोलिस निरीक्षकांच्या अंतर्गत बदल्या करण्यात आल्या आहेत. याबाबत सोमवारी (दि. ३) रात्री उशिरा आदेश देण्यात आले.
मागील काही दिवसांपासून पिंपरी- चिंचवड शहर पोलिस दलात अंतर्गत बदल केले जाणार, अशी चर्चा सुरू होती. सोमवारी या चर्चेला अखेर पूर्णविराम मिळाला. पोलिस आयुक्त विनयकुमार चौबे यांनी अंतर्गत सुव्यवस्था राखण्यासाठी नवे कारभारी दिले आहेत.
पोलिस निरीक्षक दिलीप शिंदे यांची दिघी ते वाहतूक शाखा, पोलिस निरीक्षक वर्षाराणी पाटील यांची देहूरोड ते वाहतूक शाखा, पोलिस निरीक्षक ज्ञानेश्वर काटकर यांची गुन्हे शाखा युनिट एक ते चिखली, पोलिस निरीक्षक मछिंद्र पंडीत गुन्हे शाखा युनिट चार ते दिघी, पोलिस निरीक्षक वसंत बाबर चिखली ते महाळुंगे, पोलिस निरीक्षक ज्ञानेश्वर साबळे यांची महाळुंगे ते देहूरोड पोलीस ठाण्यात बदल्या करण्यात आल्या आहेत.












