न्यूज पीसीएमसी नेटवर्क
पिंपरी (दि. ०४ एप्रिल २०२३) :- गेल्या तीन दिवसापासून अल्पवयीन मुलगी बेपत्ता होती. मुलीचा शोध लागला असून तीचा खून करण्यात आला आहे. ही घटना मंगळवारी (दि. ४) घरकुल चिखली येथे उघडकीस आली.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, मुलीच्या खुनाप्रकरणी शनिवारी तिची आई जुलेखा समीर शेख (४४, रा. सृष्टी सोसायटी चिखली) यांनी चिखली पोलीस ठाण्यात तक्रार दिली होती. तक्रारीवरून पोलिसांनी अज्ञातांवर अपहरणाचा गुन्हा दाखल केला आहे.
तक्रारदार यांची मुलगी शनिवारपासून बेपत्ता होती. दरम्यान, पोलीस शोध घेत असताना आज घरकुल येथील एका पडक्या इमारतीत अज्ञातांनी तिचा खून केल्याचे उघड झाले. याबाबत पोलिसांना माहिती मिळताच स्थानिक पोलिसांसह गुन्हे शाखेची पथके घटनास्थळी दाखल झाले. या प्रकरणात पोलिसांनी दोन आरोपींना ताब्यात घेतले आहे. तसेच या प्रकरणाचा पुढील तपास पोलीस करत आहेत.












