- परजिल्ह्यातून तब्बल ४३ दुचाकी जप्त..
- चोरीची वाहनं खरेदी करणारे ग्राहकही गोत्यात…
न्यूज पीसीएमसी नेटवर्क
पिंपरी (दि. ८ एप्रिल २०२३) :- पिंपरी चिंचवड, पुणे जिल्हा, अहमदनगर, औरंगाबाद येथुन दुचाकी चोरी करणाऱ्या पाच जणांच्या वाकड पोलीस स्टेशनच्या तपास पथकाने मुसक्या आवळल्या आहेत. ५ आरोपींकडून तब्बल २१,५०,००० किमतीच्या एकुण ४३ दुचाकी वाहनं जप्त केली आहेत. तसेच चोरीची वाहने विकत घेणाऱ्यांवरसुध्दा कारवाई केली आहे.
तापकीर मळा चौक येथे एक दुचाकी चोर हा चोरीच्या दुचाकीची विक्री करण्याकरीता येणार आहे, अशी माहिती पोलिसांना मिळाली. सपोनि संतोष पाटील, पोउपनि सचिन चव्हाण व त्यांच्या पथकाने सापळा रचून संशयीत आरोपीला ताब्यात घेतले. नितीन राजेंद्र शिंदे (वय २० वर्ष, रा. शेकापुर, शिंदेवस्ती, ता. आष्टी, जि. बीड) असे आरोपीचे नाव आहे. त्याच्याकडून होंडा शाईन (एमएच२४एएच१५२०) शिताफीने ताब्यात घेतली. त्याचेकडे अधिक तपास केला असता त्याचेकडे असलेली दुचाकी त्याने रहाटणी भागातून चोरी केली असल्याचे तपासात सांगितले. त्याबाबत वाकड पोलीस ठाणे येथे गु.र.नं. २३२ / २०२३ भादंवि कलम ३७९ अन्वये गुन्हा नोंद असल्याचे उघडकीस आले.
त्याचा मुख्य सुत्रधार आरोपी केशव महादेव पडोळे (वय २५ वर्षे रा. दादा बोडके यांच्या खोलीत भाडयाने, बोडकेवाडी, माण ता. मुळशी जि.पुणे; मुळ रा. केळ सांगवी ता. आष्टी जि.बीड) याच्यासह त्याचे इतर साथीदार १) नवनाथ सुरेश मुटकुळे (वय २४ वर्षे रा. बालाजी कॉलनी, सगर यांचे खोलीत भाडयाने, थेरगाव, मुळ रा. करंजी ता. पाथर्डी जि.अहमदनगर), ऋषीकेश अजिनाथ भोपळे (वय २३ वर्ष, रा. पारगाव जोगेश्वरी ता. आष्टी जि.बीड), अमोल दगडु पडोळे (वय २४ वर्षे रा. केळसांगवी ता. आष्टी जि. बीड) यांना वेगवेगळया ठिकाणावरुन पकडुन त्यांना अटक करण्यात आली आहे.
त्यांचेकडे कौशल्यपूर्वक तपास करुन वाकड पो.स्टे. हद्दीतील एकुण १४, हिंजवडी पो.स्टे. हद्दीतील ०४, बारामती तालुका पो.स्टे. हद्दीतील ०७, रांजणगाव पो.स्टे. हद्दीतील ०३ गुन्हे, अहमदनगर कॅम्प पो.स्टे. हद्दीतील ०२, बारामती शहर, वाळुंज एमआयडीसी, पाथर्डी, कोतवाली, कर्जत, श्रीगोंदा पो.स्टे. कडील प्रत्येकी ०१ असे एकुण ३६ गुन्हे केल्याचे उघडकीस आणले असुन सदर गुन्हयातील ३६ मोटर सायकल व इतर ०७ चोरीच्या मोटार सायकल अशा एकुण ४३
चोरीच्या २१.५० लाख रुपये किंमतीच्या दुचाकी हस्तगत करण्यात आलेल्या आहेत. उघड ३६ गुन्हयांव्यतिरिक्त त्यांचेकडुन हस्तगत केलेल्या बजाज प्लॅटीना MH 12 GY 5650, मेस्ट्रो MH 14 GP 4416, बजाज पल्सर MH 14 AA 9679, हिरो स्प्लेण्डर MH 31 BD 3608, होंडा युनिकॉर्न MH 14 HF 6391, होंडा शाईन MH 12 MK 5481, हाँडा अॅक्टिवा MH 23 AZ 3373 यांचा तपास सुरु आहे.
आरोपी मोटर सायकल चोरुन त्या परजिल्हयात विकत होते व काही नागरीक मोटर सायकलचे कागदपत्रांची पडताळणी तसेच सत्यता न तपासता स्वस्तामध्ये मिळतात म्हणुन चोरीच्या मोटर सायकल विकत घेत आहेत. चोरीच्या मोटार सायकल आहेत हे माहित असतानाही त्या विकत घेतल्यामुळे गुन्ह्यात भादंवि कलम ४११ चा अंतर्भाव करुन एकुण १७ जणांवर कारवाई करण्यात येत आहे. नागरिकांनी दक्ष व जागरुक राहुन मोटर सायकलच्या कागदपत्रांची पडताळणी तसेच सत्यता न तपासता कोणतेही वाहन विकत घेवु नये. तसेच कोणी अशा प्रकारे कागदपत्रे नसताना मोटर सायकल विकत असल्याबाबतचा प्रकार निदर्शनात आल्यास तात्काळ पोलीसांशी संपर्क साधावा, असे आवाहन पोलिसांनी केले आहे.
ही कारवाई विनयकुमार चौबे, पोलीस आयुक्त, पिंपरी चिंचवड, मनोज लोहीया, सह पोलीस आयुक्त, डॉ. संजय शिंदे, अपर पोलीस आयुक्त पिंपरी चिंचवड, डॉ. काकासाहेब डोळे, पोलीस उप आयुक्त, परि- २. पिंपरी चिंचवड, श्रीकांत डिसले सहा. पोलीस आयुक्त, वाकड विभाग, पिंपरी चिंचवड यांच्या मार्गदर्शनाखाली सत्यवान माने, वरिष्ठ पोलीस निरीक्षक, संतोष पाटील पोलीस निरीक्षक गुन्हे-१, रामचंद्र घाडगे, पोलीस निरीक्षक गुन्हे २, सपोनि संतोष पाटील, सपोनि. संभाजी जाधव, पोउपनि सचिन चव्हाण, सपोफो बिभीषण कन्हेरकर, सपोफी. बाबाजान इनामदार, सपोफो, राजेंद्र काळे, पोहवा. संतोष बर्गे, पोहवा बंदु गिरे, पोहवा. संदीप गवारी, पोहवा. दिपक साबळे, पोहवा. स्वप्निल खेतले पोहवा. अतिश जाधव, पोहवा प्रमोद कदम, पोना प्रशांत गिलबीले, पोना अतिक शेख, पोना. विक्रांत चव्हाण, पोना, राम तळपे, पोशि, अजय फल्ले, पोशि. तात्या शिंदे, पोशि कौतय खराडे, पोशि. भास्कर भारती, पोशि स्वप्निल लोखंडे, पोशि, सौदागर लामतुरे, पोशि विनायक घारगे, पोशि. रमेश खेडकर, पोशि. सागर पंडीत (परि-०२ कार्यालय) यांनी मिळुन केली आहे.