न्यूज पीसीएमसी नेटवर्क
पिंपरी (दि. १२ एप्रिल २०२३) :- राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे नेते व सामाजिक कार्यकर्ते बाबू अण्णा दुराई यांच्या वाढदिवसाच्या निमित्ताने देहूरोड परिसरात आयोजित करण्यात आलेल्या मोफत आरोग्य तपासणी व रक्तदान शिबीरास उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला.
या शिबिराच्या उद्घाटनप्रसंगी राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे देहूरोड शहर अध्यक्ष प्रवीण झेंडे, कार्याध्यक्ष किशोर गाथाडे, बाळासाहेब जाधव, अशपाक शेख, सचिन भूम्बक, अभिषेक म्हासे, राहुल अडसूळ, प्रमोद रोकडे तसेच महिलामध्ये पुणे जिल्हा उपाध्यक्ष राजश्री राऊत, सुनीता विश्वकर्मा, अमृता जाधव, कलिका घुले ज्योती वैरागर, सुरेखा गायकवाड, हेमाताई आदी महिला पदाधिकारी सुद्धा उपस्थित होत्या.
कार्यक्रमाचे आयोजन दक्षिण भारतीय सेलच्या मावळ तालुका अध्यक्ष हेमाताई रेड्डी, मावळ तालुका युवक अध्यक्ष समीर सत्तेलू, देहूरोड शहर अध्यक्ष शिवकुमार मुर्गन (बल्ली अण्णा ) देहूरोड शहर महिला अध्यक्षा अर्चनाताई कोळी, मावळ तालुका कार्याध्यक्ष विजय तेलगू, वेंकटेश पुजारी, आप्पा आईगोळ आदींनी आयोजन केले.












