- अदांजे ७,७०,००० रुपयांचा मुद्देमाल हस्तगत…
न्यूज पीसीएमसी नेटवर्क
पिंपरी (दि. १७ एप्रिल २०२३) :- भोसरी परिसरात गेल्या काही दिवसांमध्ये अचानक ऑटो रिक्षा चोरीचे प्रमाण वाढले होते. या चोरीच्या गुन्ह्यांना आळा घालून गुन्हे उघडकीस आणण्यासाठी भोसरी पोलीस स्टेशन तपास पथकाच्या दोन टिम तयार करण्यात आल्या होत्या. (दि. ४) रोजी तपास पथक पोलीस स्टेशन हद्दीत पेट्रोलींग करीत होत. दरम्यान त्यांना एका ऑटो रिक्षासह दोन संशयीत इसम जाताना दिसले. ऑटो रिक्षा थांबविण्याचा प्रयत्न केला.. परंतु ऑटोरिक्षासह आरोपी जोरात पळुन जावु लागले. त्यांचा पाठलाग करून आर्यन प्रमोद भालेराव व सुमित भिम सुर्यवशी (दोघे रा. दापोडी) यांना ऑटो रिक्षासह ताब्यात घेतले. भोसरी पोलीस स्टेशन येथे आणुन त्यांच्याकडे तपास केला. त्यांनी ऑटो रिक्षा त्यांचा साथीदार पाहिजे आरोपी रिजवान रमजान मुलानी (रा. परिवर्तन हौ. सोसा. चिखली) याच्या मदतीने चोरी केल्याचे तपासात निष्पन्न झाले. त्यांना गुन्ह्याच्या तपास कामी अटक करण्यात आले आहे.
गुन्ह्यात पाहिजे आरोपी रिजवान रमजान मुलानी याचा शोध घेत असताना तो एक चोरीच्या ऑटो रिक्षासह मिळुन आला. त्याने सदरची ऑटोरिक्षा वरील आरोपीच्या मदतीने चोरी केल्याचे तपासात निष्पन्न झाले. त्याला अटक करून त्याची पोलीस कोठडी रिमांड घेवुन त्याच्याकडे तपास केला असता वर नमुद तीन्ही आरोपींनी मिळुन आणखी दोन अॅटो रिक्षा व एक मोटार सायकल चोरी केल्याचे निष्पन्न झाले. त्यांच्याकडुन अंदाजे १,७०,००० रुपये किंमतीची १ महागडी स्पोर्ट बाईक व अंदाजे ६,००,००० रुपये किमतीच्या ४ ऑटो रिक्षा असा एकूण ७,७०,००० रुपये किंमतीचा मुद्देमाल हस्तगत करण्यात आला असून भोसरी पोलीस स्टेशनकडील एकुण ०५ गुन्हे उघडकीस आले आहेत. भोसरी पोलीस अधिक तपास करीत आहेत.
ही कामगिरी पोलीस आयुक्त विनयकुमार चौबे, पोलीस सह आयुक्त मनोज लोहीया, अप्पर पोलीस आयुक्त डॉ. संजय शिंदे, पोलीस उपायुक्त परिमंडळ १ विवेक पाटील, सहाय्यक पोलीस आयुक्त, पिंपरी विभाग श्रीमती प्रेरणा कट्टे वरिष्ठ पोलीस निरीक्षक भास्कर जाधव यांच्या प्रत्यक्ष मार्गदर्शनाखाली सहायक पोलिस निरिक्षक, कल्याण घाडगे, पोलीस उप-निरीक्षक मुकेश मोहारे, तसेच सहा. पोलीस फौजदार राकेश बोयणे, पोलीस अंमलदार सचिन गारडे, नवनाथ पोटे, धोंडीराम केंद्रे, प्रतिभा मुळे, आशिष गोपी, संतोष महाडीक, तुषार वराडे, स्वामी नरवडे, सचिन सातपुते, सागर जाधव यांनी सदरची उल्लेखनीय कामगिरी केली आहे.
















