न्यूज पीसीएमसी नेटवर्क
पिंपरी (दि. १७ एप्रिल २०२३) :- पिंपरी चिंचवड शहर जिल्हा काँग्रेसच्या वतीने आज सोमवारी (दि. १७) निगडी येथे ‘जबाब दो मोदी जबाब दो’ आंदोलन करण्यात आले. त्यानंतर अप्पर तहसीलदार यांना निवेदन देण्यात आले.
यावेळी पिंपरी चिंचवड शहर जिल्हा काँग्रेसचे अध्यक्ष डॉ. कैलास कदम, माजी नगरसेवक विश्वास गजरमल, महिला अध्यक्षा सायली नढे, वरिष्ठ उपाध्यक्ष नरेंद्र बनसोडे, पिंपरी ब्लॉक अध्यक्ष विश्वनाथ जगताप, चिंचवड ब्लॉक अध्यक्ष ज्ञानेश्वर मलशेट्टी, भोसरी ब्लॉक अध्यक्ष विठ्ठल शिंदे, ग्राहक सेल अध्यक्ष झेविअर अंथोनी, रोजगार व स्वयंरोजगार अध्यक्ष विशाल सरवदे, स्वाती शिंदे, डॉ. मनिषा गरुड, भारती घाग, सुनीता जाधव, सुवर्णा कदम, शितल सिकंदर, अबूबकर लांडगे, बाबासाहेब बनसोडे, प्रा. किरण खाजेकर, किरण नढे, सौरभ शिंदे, स्वप्नील बनसोडे, मिलिंद फडतरे, हरीश डोळस, जितेंद्र छाब्रा, गौतम ओव्हाळ, आकाश शिंदे, संदीप शिंदे, अण्णा कसबे, दीपक भंडारी, सतीश भोसले, भास्कर नारखेडे, वसंत वारे आदींसह पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते.
माजी राज्यपाल मलिक यांनी केलेल्या आरोपांमुळे सर्वसामान्य जनतेच्या मनात संशय व संभ्रम निर्माण झाला आहे. तसेच अदानी समूहाच्या घोटाळ्याबद्दल, शेतकऱ्यांचे आयुष्य बर्बाद करणाऱ्या तीन काळ्या कायद्यांबद्दल, पीक विम्याच्या नावाखाली अदानी – अंबानी साठी अन्नदात्याचा बळी घेणारे व जनतेची तिजोरी लुटून देणारे कोण ? याबद्दल “जबाब दो मोदी, जबाब दो” हे आंदोलन करण्यात आले, असे कॉंग्रेसच्या वतीने सांगण्यात आले.
















