- भाजयुमो प्रदेश सरचिटणीस अनुप मोरे यांची माहिती..
- ऑनलाईन लिंकद्वारे मॉक टेस्ट सिरीजची व्यवस्था…
न्यूज पीसीएमसी नेटवर्क
पिंपरी (दि. २९ एप्रिल २०२३) :- भारतीय जनता पार्टी महाराष्ट्र प्रदेश युवा मोर्चाच्या वतीने उपमुख्यमंत्री तथा गृहमंत्री देवेंद्र फडणवीस, भाजपाचे प्रदेशाध्यक्ष आमदार चंद्रशेखर बावनकुळे, प्रदेश सरचिटणीस तथा युवा मोर्चा प्रभारी विक्रांत पाटील,युवा मोर्चा प्रदेश अध्यक्ष राहुल लोणीकर यांच्या मार्गदर्शनाखाली युवा मोर्चा प्रदेश सरचिटणीस अनुप अविनाश मोरे यांच्या नेतृत्वाखाली CET for Engineering, CET for Pharmacy, NEET for Medical, JEE for Engineering and CET for Law ची तयारी करण्यासाठी महाराष्ट्रातील विद्यार्थ्यांना www.bjpexams.in या लिंकवर मोफत ऑनलाईन मॉक टेस्ट (सराव परीक्षा) सिरीज आयोजित केली आहे.
भारतीय जनता युवा मोर्चाच्या माध्यमातून युवकांसाठी सतत चांगले उपक्रम राबवले जातात. शहरी व ग्रामीण भागातील गरीब होतकरु विद्यार्थ्यांची क्लासेस लावण्याजोगी आर्थिक परिस्थिती नसते. परिणामी त्यांना अभ्यासाला मुकावे लागते. परंतु, या ऑनलाईन लिंकच्या माध्यमातून मोफत वस्तुनिष्ठ प्रश्न या माध्यमातून उपलब्ध होणार आहेत. विद्यार्थ्यांनी त्याचा सराव केल्यास मेडिकल, अभियांत्रिकी व कायदा अभ्यासक्रम करण्यास महाविद्यालयीन प्रवेश मिळण्याचा मार्ग मोकळा होणार आहे. त्यासाठी अत्यंत उपयुक्त अशा मोफत ऑनलाईन मॉक टेस्ट (सराव परीक्षा) सिरीजचा विद्यार्थ्यांनी लाभ घ्यावा. त्यासाठी लिंकवर जाऊन नावाची नोंदणी करावी.
विद्यार्थ्यांना बाहेरून ऑनलाईन मॉक टेस्ट (सराव परीक्षा) सिरीज १० हजार पेक्षा जास्त पैसे देऊन विकत घ्यावी लागते. भारतीय जनता पार्टी युवा मोर्चा महाराष्ट्र यांच्या माध्यमातून मोफत ही टेस्ट सिरीज उपलब्ध करून देण्यात येत आहे. त्यामुळे विद्यार्थ्यांना याचा फायदा होणार आहे. सात लाख पेक्षा अधिक विद्यार्थ्यांना अंतिम परीक्षेला मदत होणार आहे, अशी माहिती भाजयुमोचे प्रदेश सरचिटणीस अनुप मोरे यांनी सांगितली.
उपक्रमाचे स्वरूप काय?…
विद्यार्थ्यांसाठी ऑनलाईन मॉक टेस्ट सिरीज (सराव परीक्षा) मध्ये यांनी केले आहे. प्रत्येक चाप्टरवर आधारित स्वतंत्र टेस्ट होणार आहे. विद्यार्थी हव्या त्यावेळी यामद्ये सहभागी होऊ शकतात. टेस्ट दिल्यानंतर लगेच निकाल व निकाचे विश्लेषन होणार आहे. www.bjpexams.in या लिंकवर विद्यार्थी संगणक, लॅपटॉप अथवा मोबाईलवर परीक्षा देऊ शकतात. 10 हजारहून अधिक प्रश्न विश्लेशनासह यात सामाविष्ठ करण्यात आले आहेत. या ऑनलाईन www.bjpexams.in मॉक टेस्ट सिरीजमध्ये महाराष्ट्रातील अंदाजे सात लाखांहून अधिक विद्यार्थ्यांपर्यंत आम्ही पोहचणार आहोत. स्वतः व आपले मित्र, विद्यार्थी यांनी सहभाग घ्यावा, असे आवाहन भाजप युवा मोर्चाचे प्रदेश सरचिटणीस अनुप मोरे यांनी केले आहे.