न्यूज पीसीएमसी नेटवर्क
पिंपरी (दि. २९ एप्रिल २०२३) :- वाहन चो-या करणारा सराईत गुन्हेगार हा काळेवाडी परीसरात येणार आहे, अशी माहिती पोलिसांना मिळाली. काळेवाडी येथील लकी बेकरी चौकात पोलिसांनी सापळा लावला. आरोपीला ताब्यात घेतले. आरोपीला पोलीस स्टेशन येथे आणले. दिलीपकुमार शालीग्राम विश्वकर्मा (वय २४ वर्षे, रा. ठोंबरे चाळ, परीस कॉलनी, नं. १, तापकीर नगर काळेवाडी) असे अटक आरोपीचे नाव आहे.
त्याच्याकडे अधिक तपास केला असता त्याने पिंपरी चिंचवड परीसरातील रिक्षा चोरीचे ३ गुन्ह्यांची कबुली दिली. त्याच्याकडुन एकुण ६,००,००० रुपये किंमतीच्या ३ रिक्षा हस्तगत केल्या. आरोपीवर वाकड, चतुःश्रीगी येथे तीन गुन्हे दाखल आहेत.
ही कारवाई विनयकुमार चौबे पोलीस आयुक्त, डॉ. संजय शिंदे सह. पोलीस आयुक्त, वसंत परदेशी, अपर पोलीस आयुक्त, डॉ. काकासाहेब डोळे पोलीस उप आयुक्त, परि-२, श्रीकांत डिसले, सहा. पोलीस आयुक्त वाकड विभाग यांच्या मार्गदर्शनाखाली सत्यवान माने, वरिष्ठ पोलीस निरीक्षक, संतोष पाटील पोलीस निरीक्षक गुन्हे-१, रामचंद्र घाडगे पोलीस निरीक्षक गुन्हे-२, सपोनि संतोष पाटील, पोउपनि सचिन चव्हाण, सपोफोविभीषण कन्हेरकर, सपोफी. बाबाजान इनामदार, सपोफी राजेंद्र काळे, पोहवा. बंदु गिरे, पोहवा संतोष बर्गे, पोहवा. संदीप गवारी, पोहवा. दिपक साबळे, पोहवा. स्वप्निल खेतले पोहवा. अतिश जाधव, पोहवा प्रमोद कदम, पोना. अतिक शेख, पोना. विक्रांत चव्हाण, पोना. राम तळपे, पोना. प्रशांत गिलबीले, पोशि. अजय फल्ले, पोशि. तात्या शिंदे, पोशि कीर्तय खराडे, पोशि भास्कर भारती, पोशि स्वप्निल लोखंडे, पोशि, सौदागर लामतुरे, पोशि. विनायक घारगे, पोशि रमेश खेडकर यांनी मिळून केली आहे.