न्यूज पीसीएमसी नेटवर्क
पिंपरी (दि. ०२ मे २०२३) :- दोघांच्या विरोधात फिर्यादीने तक्रार दिली होती. त्याचा राग आरोपींनी मनात धरला. गुन्ह्याचा घटनास्थळी पंचनामा करण्यासाठी पोलीस आले होते. पोलीस पंचनामा करून माघारी जात असताना आरोपी दोघींनी ‘तू काल आमच्यावर खोटा गुन्हा दाखल केला आहे, तुम्ही आता इथे कसे राहता ते बघते व तू कालची तक्रार मागे घे, नाहीतर मी तुझ्या वडीलावर व भावावर खोटी तक्रार देईल, असे म्हणत शिवीगाळ करीत दमदाटी केली. घरात घुसून फिर्यादीच्या अंगावर धावून गेल्या, असे फिर्यादीत नमूद आहे.
ही घटना (दि. ०१) रोजी दुपारी १.०० च्या सुमारास मेन बाजार, देहूरोड येथे घडली.
महिला फिर्यादीने दोन महिला आरोपींच्या विरोधात फिर्याद नोंदविली आहे. देहुरोड पोलिसांनी २७४/२०२३ भादवि कलम ४२५, ३५२,५०४, ५०६, ३४ प्रमाणे गुन्हा दाखल केला आहे.