न्यूज पीसीएमसी नेटवर्क
पिंपरी (दि. ०२ मे २०२३) :- पिंपरीतील मिलिंदनगर येथील पत्राशेड झोपडपटटी येथे आरोपीने दोन लोखंडी तलवारी, एक कोयता व एक लोखंडी कु-हाड घराशेजारील पत्र्याच्या खाली लपवुन ठेवली. याबाबत पोलिसांना माहिती मिळाली.
पोलिसांच्या गुंडा विरोधी पथक, गुन्हे शाखेने (दि. ३०/०४/२०२३) रोजी सायंकाळी ७:३० वाजेच्या सुमारास कारवाई करीत आरोपीला ताब्यात घेतले.
त्याच्यावर पिंपरी पोलीस ठाण्यात ४८९/२०२३ भा. हत्यार का. कलम ४,२५ महा. पो. अॅ. कलम ३७ (१) (३) सह १३५ प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला आहे. करणसिंग ऊर्फ कल्ला चरणसिंग टाक (वय २० वर्षे, रा. पत्राशेड, मिलींदनगर, पिंपरी) असे अटक आरोपीचे नाव आहे.