न्यूज पीसीएमसी नेटवर्क
पिंपरी (दि. ४ मे २०२३) :- टीडीयम मराठी चित्रपट पुर्ण वेळ प्रदर्शित करण्यासाठी चित्रपटगृह टाळाटाळ करीत आहेत. ही अत्यंत चिंताजनक बाब आहे. हा चित्रपट जवळपास चार करोड रुपये खर्च करून तयार करण्यात आला आहे.
परंतु, प्रेक्षकांना तो पाहण्यासाठी चित्रपटगृह मालक चित्रपटगृह देत नाहीत, टाळाटाळ करीत आहेत . या निंदनीय प्रकाराचा भाजपा सांस्कृतिक आघाडी प्रदेश अध्यक्षा प्रिया बेर्डे यांच्या नेतृत्वाखाली जाहीर निषेध करीत आहे.
टी डी एम चित्रपटासाठी चित्रपटगृह उपलब्ध करून देण्यात यावे. अन्यथा चित्रपटगृहात आंदोलन करण्यात येईल. या कामी उद्भवनार्या गोष्टींची जबाबदारी प्रशासनाची राहील, असा इशारा भाजपा सांस्कृतिक आघाडीचे वेदांग महाजन यांनी पत्रकाद्वारे दिला आहे.















